
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर –
आयुर्वेदाची कालानुरूप ओळख करून देणे व मूळ सिद्धांतांना परत एकदा स्पष्ट करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयुर्वेदावर प्रकाश टाकणारी साहित्यकृती प्राचीन भारतीय सामान्य विज्ञान आणि अर्वाचीन विज्ञान यांचा तुलनात्मक अभ्यास या साहित्यकृतींचे लेखन डॉ.शिवाजी नेळगे यांनी केले आहे. त्याचा प्रकाशन सोहोळा डॉक्टर्सडे चे औचित साधून घेण्यात आला.
चला कवितेच्या बनात आयोजित व धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्ता पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर्स डे निमित्याने संपन्न झाला. आयुर्वेदाचे अभ्यासू सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी ईश्वरराव नेळगे, वर्धा. यांनी लिहिलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास मेघा क्लिनिकचे डॉ. धनाजीराव कुमठेकर,साई क्लिनिकचे डॉ. चंद्रकांत कोठारे , प्रसिद्ध आयुर्वेदतज्ञ डॉ.सुरेश गरड आदी मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ दत्ता पाटील म्हणाले की इतिहासाचा वेध, नाडीतंत्र, रासायनिक समन्वय आणि एकीकरण, श्वसन आणि हवेची अदलाबदल, शरीर द्रव आणि रक्ताभिसरण, जीव मूलद्रव्ये, पचन आणि पोषण इत्यादी बद्दल अभ्यासपूर्वक लेखन डॉ.शिवाजी नेळगे यांनी या पुस्तकात केले आहे.
डॉ.सुरेश गरड म्हणाले की अत्यंत
महत्त्वपूर्ण माहितीचे संकलन करून आयुर्वेदातील शब्द त्यांचे अर्थ व व्याख्या यांची उकल या पुस्तकात केली आहे. या वेळी डॉ. धनाजीराव कुमठेकर, डॉ. चंद्रकांत कोठारे यांचेही मौलिक मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संचलन संयोजक अनंत कदम यांनी केले तर पत्रकार दयानंद बिरादार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे सेवानिवृत्त अधिकारी मुरलीधर जाधव, प्रा.राजपाल पाटील, हनुमंत म्हेत्रे, राजेंद्र एकबेकर, स्वामी योगेश, आनंद बिरादार आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास ग्रंथ मित्र दीपक बलसुरकर, बालाजी सुवर्णकार, अंतेश्वर चालवा, किशन दत्तात्रय उगले, कलावती भातांबरे, नीता कांबळे, लता नेळगे, वट्टमवार सुमित्रा, प्रतिभा बिरादार आदींसह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थितीत होते.