दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची मुंबई येथे जाऊन शिवसेना प्रणित किसानसेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर यांनी सदिच्छा भेट घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना पाठिंबा जाहिर केला.
याबाबत पत्रकारांशी बोलताना किसान सेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर म्हणाले की,
राज्यातील ४०शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करून शिवसेनेशी गदारी करून शिंदे गटात सामील होऊन भाजपाची हातमिळवणी करून ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यामुळे राज्याभरातील शिवसेने मध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून राज्यातील जवळपास ८० ते ९० टक्के शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत . शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन शिवसेनेशी गदारी करणाऱ्यांना आगामी निवडणुकीत शिवसैनिक व जनता धडा शिकविल्या शिवाय राहाणार नाही यांच्यातील एक ही बंडखोर पुढच्या निवडणुकीत आमदार होणार नाही .
लोहा तालुक्यातील सर्व शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असे किसान सेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर यांनी सांगितले.
