दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनीधी – भरत पवार…
लोहा तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून सतत पावसामुळे अनेक शेतकऱ्याच्या पिकाचे फार मोठे नुकसान झाल्याचे चित्र लोहा तालुक्यासह जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे सतत च्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे ह्या मुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर संकट आले आहे लोहा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सतत पावसामुळे व पूर परिस्थिती मूळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आदीच शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्या कारणामुळे शेतकऱ्याचे डोकेदुखी वाढल्या कारणामुळे अनेक या तालुक्यातील अनेक शेतकरी तर मोठ्या संकटामध्ये अडकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तालुक्यातील शेतकरी सरकारकडे मदतीची अपेक्षा करत असल्याचे शेतकऱ्याकडून ऐकण्यास मिळत आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि पिकांचे मुसळधार पावसामुळे झाल्यामुळे सरकारकडे कर्जमाफी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना हेक्टरी ५०,००० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा सदस्य अनिलदादा गायकवाड यांनी निवेदनाव्दारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
