दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
धनगरवाडी ;- नांदेड येथून जवळच असलेल्या धनगरवाडी येथील श्री. साईबाबा मंदिरात गुरू पौर्णिमेनिमीत्य आरती व महाप्रसादाचे आयोजन माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. गणेश पाटील सावळे यांच्या वतीने आयोजित केले होते या वेळी लोकप्रिय खासदार श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई प्रतापराव पाटील चिखलीकर व कन्या सौ. प्रणिताताई (देवरे) पाटील चिखलीकर यांनी महाप्रसाद वाटप केला. याप्रसंगी लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री. बळीराम पाटील कदम, उपसभापती श्री. लक्ष्मण बोडके, सुनील मोरे, इंजिनिअर वाघमारे साहेब, सुहास पाटील, कैलास पाटील, उमेश पाटील तसेच असंख्य साईभक्त उपस्थित होते. सर्वानी महाप्रसाद घेतला.
