
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
ता. कोरेगाव,करंजखोप येथील येथील सामाजिक कार्यकर्ते उद्धव कर्णे यांच्या वाढदिवसानिमिंत्त करंजखोप येथे बुधवार करंजखोप मध्ये सकाळी 10. वाजता प्राथमिक शाळा येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, विविध रोपांचे वृक्षारोपण, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप, मान्यवरांच्या उपस्थितीत,करण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता अभिष्टचिंतन सत्कार सोहळा कार्यक्रम होणार आहे, या विविध कार्यक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच लालासो नेवसे, नुतन उपसरपंच वैशाली उमेश धुमाळ, माजी सरपंच प्रमोद सोनवणे,शंकर शिंदे, संभाजी गोसावी (पत्रकार) अशोक सोनवणे माजी पोलीस मुंबई, करंजखोप जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री.ढमाळ सर व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक कर्मचारी, प्राचार्य चंद्रकांत सर (भारत विद्या मंदिर वाघोली व ज्युनिअर कॉलेज) प्राचार्य धायगुडे साहेब( मालोजीराजे हायस्कूल व जुनिअर कॉलेज लोणंद) उद्योजक तानाजीराव सोनवणे, उद्योजक संजय बाबा कर्पे, पत्रकार अरुण जायकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शिरसागर, भरत लोकरे सर, बाळकृष्ण देसाई सर,करंजखोप सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी गावांतील ग्रामस्थ तसेच उत्तर कोरेगाव भागातील राजकीय सामाजिक सर्व शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवरांकडूंन कोरेगांव तालुक्यांचे विद्यमान युवा नेते उद्धवजी करणे साहेब यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यात आल्या.