दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
भारतीय ट्रायबल पार्टी चे कार्यकर्ता व पदाधिकारी यांची दि १०/०७/२०२२ रोजी बालापुर ती. विक्रमगड जि. पालघर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत विविध विषयांवर विचार विनिमय व चर्चा करण्यात आली.
१. पार्टी ची विचारधारा व समाजाच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करणे. नविन सदस्य नोंदणी प्रक्रिया.
२. पार्टी वाढविण्यासाठी प्रयत्न व रणनीती
३. सध्याचे पदाधिकारी यांचे स्वागत व पार्टी वाढविण्यासाठी त्यांचे कडून मार्गदर्शन
४. नविन पदाधिकारी यांची निवड प्रक्रिया यावर मार्गदर्शन
५. मा. राज्य अध्यक्ष व मा. प्रभारी यांच्या सूचनेनुसार व परवानगीने आयत्या वेळी येणारे विषय. त्यावर चर्चा.
बैठकीत मा. मेघनाथ गवळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व मा. परेश वसावा राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा प्रभारी महाराष्ट्र राज्य यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मा. परेश वसावा यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष डॅा. उल्हास जयंत वसावे, भारतीय ट्रायबल पार्टी दादरा नगर हवेली – सिल्वासा चे प्रदेश अध्यक्ष श्री. भिकन खुलात, भारतीय ट्रायबल टाईगर सेना मुंबई अध्यक्ष श्री जयेश बरफ, पालघर जिल्हा संघटक श्री मोहन गुहे, पालघर जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय घाटाळ, अजय जाधव, राम गवारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
