
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
गावकर्यांनी गावातच राहून काळजी घ्यावी… अत्यावश्यक सेवा वा अडचणीसाठी आमच्याशी संपर्क करावे…
देगलूर: देगलूर तालुक्यातील करडखेड परिसरातील सांगवी (क) या गावच्या पुलाचे काम अनेक दिवसांपासून रखडल्यामुळे चालू असलेल्या अतिवृष्टीने साध्या मुरूमाचे पुल अक्षरशः वाहून गेले. त्यामुळे काल दुपार पासून सांगवीकरांचा पूर्णतःहा संपर्क तुटला आहे. तसेच कावळगावच्या जुन्या गावातील ब्रीजवरून पाणी वाहू लागल्यामुळे बळेगाव व भोकसखेडचाही संपर्क तुटला आहे. तीनही गावातील सरपंच व इतरांशी संपर्कात आहोत. गावकर्यांनी काळजी घ्यावी. काही अत्यावश्यक सेवा वा अडचणी आल्या तर आमच्याशी केव्हाही संपर्क करा.
मी मा. उपजिल्हाधिकारी सौम्या शर्मा मँडमशी याबाबत चर्चा करून परिस्थिती त्यांच्या कानावर टाकलो आहे. संबधित महसूल व पंचायत कर्मचारी यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे मँडमनी आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
तरी परंतु होत असलेली अतिवृष्टी पहाता कुणी कर्मचारी वा अधिकारी दौऱ्यावर येतील याचा काही भरोसा नाही. मा. जिल्हाधिकारी ईटनकर साहेबांनाही याबाबतची सर्व माहिती पाठवलो आहे. म्हणून आपणास काही अडचण वाटली तर कळवावे. आम्ही सदैव आपल्या संपर्कात राहू. मँडमनी दिलेल्या संबंधित महसूल कर्मचाऱ्यांचे त्या परिसरातील नागरिकांना सांगितले.