
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर–
सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल, रुद्धा ता. अहमदपूर येथे आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून आषाढी एकादशीनिमित्त साक्षात विठ्ठल रुक्मिणीचे रूप धारण करून मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या या बाल गोपाल यांच्या या कार्यक्रमात हिंदू मुस्लीम ऐक्याची जोपासना करण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके तसेच प्रमुख पाहुणे म्हणून हनुमंतराव देवकाते तालुका अध्यक्ष भाजपा संचालक कुलदीप हाके, संचालिका शिवालिका हाके कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य रुत चक्रनारायण, शुभांगी सूर्यवंशी, ज्योत्स्ना स्वामीं, स्नेहा ओझा, दराडे संगीता, शुभम पोले, शेख मोसिन, केशव तोंडारे, भागवत बेंद्रे, अंगद सुरनर, चंद्रकला काडवदे,अपर्णा शिंदे, सुभद्रा महाजन व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.