
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
जोमेगाव :- लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील पाझर तलाव पुर्ण १००℅भरला असून पाझर तलावाच्या ड्यामवर बाभळीचे झाडे वाढले असून पाझर तलाव केंव्हाही फुटू शकतो . बांधास व पाळूस बाभळीच्या मुळामुळे फुटून हजारो हेक्टर क्षेत्राचे नुकसान होऊ शकते तेव्हा प्रशासनाला २८ डिसेंबर २०२१ ला निवेदन दिले होते. निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आज भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे, काही धोका निर्माण झाल्यास प्रशासन जिमेदार असेल असे भास्करराव पाटील जोमेगावकर व समस्त गावकरी मंडळी जोमेगाव यांनी प्रशासनाला कळविले आहे. याची दखल घेऊन कार्यवाही करुन जबाबदारी घेऊन हजारो हेक्टर जमीन वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत असे गावातील लोकांनी म्हटले आहे.