दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी -मानिक सुर्यवंशी
देगलूर:तालुक्यात तब्बल आठ दिवसांपासून संतत धार पावसा मूळे झालेल्या परिस्थितीचा अढावा घेण्यासाठी आमदार यानी शासकिय यंत्रनेसह सकाळी नरंगल विभागात जाऊन पहाणी केली, देगलूर येथील सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा मॅडम यानी तालुकास्तरीय यंत्रणेची तातडीने नैसर्गिक आपत्ती व्यस्थापन बाबत बैठक घेऊन. गावातील घरे, अति पावसामुळे शेतीत पाणी शिरून पिकाची नुकसान झाली असल्याचे व पावसाने बाधित होणाऱ्या संभाव्य ठिकाणांची माहिती घेऊन, आमदार जितेश अंतापुरकर यानी आपल्या मतदार संघातील अतिवृष्टी स्थीतीचा आढावा घेण्यासाठी शासकिय यंत्रने सह गावागावात जाऊन जनतेशी संवाद साधत शासनाकडे पाठपुरावा करून सर्वोतो परी मदत करण्याची ग्वाही दिले आज दि. 15 रोजी सकाळी नरंगल विभागात भेट दिले त्यावेळेस देगलूर- बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर, उपजिल्हा अधिकारी देगलूर सौम्या शर्मा मॅडम, माझी.सरपंच तराकांतराव पाटील, माझी. उपसरपंच अंबादास पाटील, अशोक कत्ते त्या सोबत गावातील नागरिक,तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक , उपस्थित होते.
