
दैनिक चालू वार्ताअंबाजोगाई तालुका प्रतिनिधी-बालाजी देशमुख
अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) ता. १५
भारज पाटी येथील ज्ञानसागर निवासी कर्णबधिर विद्यालयात शुक्रवारी (ता. १५ ) माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त लालबहादूर शिक्षण प्रसारक मंडळ गित्ता संचलित संस्थेचे सचिव दशरथ शिंदे यांच्या वतिने
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .
श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निलप्रभा ढाणे , नाथराव तिडके , ज्ञानसागर निवासी कर्णबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाजी देशमुख, पाराजी हारे, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते .