
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी- गोविंद पवार
___________________________________
शेतीचे पंचनामे हेक्टरी एक लाख रुपये अनुदान देण्यात यावे शिवसेनेचे लोहा तहसिलदारांना निवेदन
—————————————-
लोहा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लक्ष रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने लोहा तहसिलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोहा तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तेव्हा शेतकरी बांधवांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी म्हणून आज दिनांक १५ जुलै रोजी शिवसेनेचे शिष्टमंडळ शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे.
पुढे निवेदनात असे नमूद केले की, मागील सात दिवसांपासून संपूर्ण राज्यासोबत नांदेड जिल्ह्यात व लोहा तालुक्यात प्रचंड प्रमाणात पर्जन्यमान होऊन अतिवृष्टीत नुकतेच पेरणी केलेल्या सोयाबीन, कापुस ,तुर , मुग, या खरीप पिकांची प्रचंड नुकसान झाली आहे. आज शेतकरी हवालदिल झाला असुन तो पुर्णपणे उध्वस्त झाला आहे.
तेव्हा शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी एक लक्ष रुपयांच्या मदतीची गरज आहे. जर शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली नाही तर तो आत्महत्या सारखे पाऊल उचलू शकतो .
सन २०२१ पासून पुरात वाहून गेलेल्या व इतर आपत्तीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावर यांना शासनाच्या शासनाचा निधी अद्याप ही उपलब्ध झाला नसुन तो तात्काळ मंजूर करण्यासाठी पूर्वी प्रमाणे तहसीलदार यांना अधिकार देण्यात यावा तेव्हा आमची भावना तात्काळ शासनास कळवून मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच लोहा तहसीलदार व्यंकटेश मुंढे यांच्याशी तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली व निराधारांचे अनुदान तीन महिन्यांपासून रखडले आहे ते ही वाटप करण्यात यावे अशी ही बातमी शिवसेनेच्या वतीने शिष्टमंडळाने केली आहे.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे, शिवसेनेचे लोहा-कंधार विधानसभा संघटक मिलिंद पाटील पवार, शिवसेनेचे लोहा तालुका प्रमुख सुरेश पाटील हिलाल, शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन कराडे (गुंठे ) ,अमर टेलर, माधव राठोड , भुजंग हिलाल , अक्षय लोखंडे आदी उपस्थित होते.