
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -भरत पवार …..
देवणी तालुक्यातील वलाडी येथे श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपाशीर्वादाने वलांडी येथील साप्ताहिक आरती केंद्रामध्य गुरु पूर्णिमा उत्सव खूप उत्साहात साजरा झाला
– सद्गुरु परमपूज्य मोरेदादा (दिंडोरी जिल्हा नाशिक )यांनी पिठले महाराजांच्या मार्गदर्शनानुसार स्वामी समर्थ सेवा मार्ग स्थापन केलाअसून समाजातील अंधश्रद्धा दूर होऊन माणुसकी एकच जात मानवता एकच धर्म या उक्तीच्या आधारे समाजातील दुःखी पीडित लोकांचे दुःख अध्यात्मिक रित्या दूर करण्याचा एक संकल्प यावेळी करण्यात आला
सधन शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असूनही समाज कार्यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून दिले त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र आदरणीय गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी या कार्याला विश्वरूप दिले 22 देशांमध्ये हे कार्य चालू आहे 7000 केंद्र सध्या या मार्गाने कार्यरत आहेत
त्याचाच एक भाग म्हणजे आपल्या वलांडीतील साप्ताहिक आरती केंद्र या केंद्रातील प्रमुख उत्सवा पैकी गुरु पौर्णिमा हा उत्सव आज सकाळी ठीक 8 वाजल्यापासून सुरू आहे 8 वाजता भूपाळी आरती झाली त्यानंतर महाराजांच्या मूर्तीवर षडोशोपचार पूजा व अभिषेक झाला ठीक 10:30ला नैवेद्य आरती झाली ठीक 4 वाजता स्वामी चरित्र सामूहिक पारायण झाले आणि सायं आरती झाली
या आरतीला दुग्ध शर्करा योग जुळून आला ब्रह्मांडनायकाची आरती तालुका तहसीलदार यांचा हस्ते कऱण्यात आली
आपल्या देवणी तालुक्यातील स्वच्छ प्रतिमेचे तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली आरतीला व्यापारी कमिटी उपाध्यक्ष रामबिलासची बंग, व्यापारी कमिटी अध्यक्ष उमाकांत नागलगावे, नरसिंग माने, वलांडी गावचे प्रथम नागरिक सरपंच राणीताई भंडारे, नुकतेच पीएसआय या पदाची परीक्षा पास झालेले अक्षय चन्नावार, बालाजी पाटील, रोहन भंडारे, संदीप जगताप, तसेच स्वामी समर्थ सेवा केंद्रातील महिला प्रतिनिधी स्वातीताई चन्नावार भाग्यश्रीताई हुडगे तसेच शंभर ते सव्वाशे सेवेकरी उपस्थित होते केंद्र प्रतिनिधी गजानन चन्नावार व साईनाथ हुडगे यांनी गुरु पौर्णिमेनिमित्त आरती तहसीलदार साहेब यांचा हस्ते केली यावेळी त्यांच्या सत्कार करण्यात आला उपस्थित राहून सर्व सेवेकरांनी तहसीलदार साहेबांचे खूप खूप आभार मानले