
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
ऐतिहासिक पन्हाळगडावर आज पन्हाळा पोलिसांनी ट्रिपल सीट विदाऊट नंबर प्लेट, लायसन, कर्कशः हॉर्न सायलेन्सर काढून आलेल्या गाड्या, तसेच आरडा-ओरडा करत फिरणारे तरुण-तरुणी, दारू पिऊन येणारे तरुण त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे.
येत्या आठवड्यात पन्हाळा संवर्धनासाठी संपूर्ण गाव एकत्र आलो होते. यासाठी काल गाव मीटिंग सुद्धा घेण्यात आली होती. काही गावकऱ्यांनी प्रशासनाने पण यावर लक्ष घालून कारवाई करावी असे, काल मीटिंगमध्ये म्हणने मांडले होते. पोलिसांनी आपल्या खाकया दाखवत आज कारवाई केल्या
झुळझुळ वारा ,दाट ,धुके रिमझिम पडणारा पाऊस याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक ऐतिहासिक हा पन्हाळागडा कोल्हापुरातील महत्त्वाचा पर्यटन स्थळ साठी केंद्रबिंदू ठरला आहे ,हे गेल्या आठ दहा वर्षात डिजिटल माध्यमातून झालेल्या प्रसिद्धीमुळे, महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून अनेक ऐतिहासिक प्रेमी पर्यटक साठी भेट देत असतात . तसेच कोल्हापुरातील लोक दर शनिवार रविवारी या ठिकाणी या पन्हाळगडावर चारच्या दरम्यान येत असतात व खाऊन पिऊन मोज मजा करून पुन्हा नऊ-दहा कोल्हापूरला जात असतात. कारण हवे ते सर्व गडावर मिळत.असल्यामुळे वारंवार पर्यटन साठी तेच लोक आपल्याला येथे पाहाव्यास मिळतात.या बाबत पर्यटकांचे फारच कुतूहल निर्माण झाले आहे. गेल्या तीन वर्षात दोनदा रस्ता खचल्यामुळे दोन वर्ष कोरोनामुळे पन्हाळा बंद होता. त्यामुळे पर्यटनात मोठी वाढ निर्माण झाली आहे .
ही कारवाई आज सकाळपासूनच सुरू होती .दुपारी चारच्या दरम्यान पन्हाळा प्रवासी कर नाका या ठिकाणी करण्यात आली. जवळपास ३५ लोकांवर कारवाया करण्यात आल्या वीस ते पंचवीस हजार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
राजू मुल्ला पन्हाळा ज्येष्ठ गाईड यांनी, या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले आहे. आज आम्हाला पोलीस निरीक्षक साळुंखे साहेबांची आठवण आली.असेच शनिवारी , रविवारी, माननीय पोलीस निरीक्षकांनी असे कारवाया कराव्यात मग हुलडबाजी येणाऱ्या पब्लिक वर लगाम बसेल अशी माहिती दैनिक चालू वार्ता ला दिली
पन्हाळगडावर भर पावसात या कारवायासाठी पन्हाळा पोलीस निरीक्षक, अरविंद काळे, पोलीस कॉन्स्टेबल, बाजीराव चौगुले , पोलीस नाईक,मारुती पाटील,विलास जाधववर, शिवाजी जाधव, होमगार्ड शिवाजी खोत ,विजय निकम, यांनी ही कारवाई पार पाडली