
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधि:- सुशिल घायाळ
((आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बबनरावजी लोणीकर यांच्या माध्यमातून शहराचा विकास करणार)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंठा शहरातील सुपरहिट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि शिवसेनेच्या नगरसेविका सरोजाताई प्रल्हादराव बोराडे यांचे पती यांनी मुंबई येथे जाऊन महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना मंठा शहर तालुका विकासमय आणि सुजलाम सुफलाम करण्यासाठी भरीव निधीची मागणी केली असून मंठा तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून याकडेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष द्यावे म्हणून प्रल्हादराव बोराडे यांनी त्यांची भेट घेऊन साहेब, मंठा शहरा तालुक्याकडे आपले लक्ष असू द्या अशी विनंती केली.
(मंडळ शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणून शहराचा विकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार बबनरावजी लोणीकर यांच्या माध्यमातून शहराचा विकास करणार प्रल्हादराव बोराडे. मा.सभापती कृ. उ. बा. समिती मंठा)