दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
सातारा. शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सध्या गुन्हेगारांची चांगलीच वाव झाली असून शाहुपूरी पोलीस ठाण्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकांतील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या वेशभूषा करीत सराईत गुन्हेगारांना जरेबंद करण्यांत शाहुपूरी पोलिसांना चांगले यश मिळुन आहे. तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याकडूंन चांगलाच क्राईम घडत असल्यांचे जिल्हा प्रशासनांला दिसून येत आहे. असाच एक चोरीचा गुन्हा शाहूपुरी पोलिसांनी उघडकीस आणला अंजली कॉलनी मधील बांधकामावरुन सेंट्रींगच्या प्लेटा चोरुन शाहूपुरी पोलिसांनी दोन सराईत आरोपींच्या मुस्क्या आवळल्या. अनिकेत उर्फ अण्णा अर्जुन पिटेकर वय १९ रा.बेलावडे ता. कराड सध्या नामदेववाडी झोपडपट्टी व प्रशांत अण्णा येवले वय १९ रा. नामदेववाडी झोपडपट्टी अशी दोन आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन करंजे परिसरांत दोघेजण चोरीच्या सेंट्रींग प्लेटा विक्रीसाठी येणार असल्यांची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकांने बुधवार नाक्यावर सापळा रचून दोघांना ताब्यांत घेतले आणि त्यांच्याकडूंन चोरीच्या सेंट्रिंग प्लेटा व गुन्ह्यांत वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे,सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती. आँचल दलाल मॅडम, पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हसन तडवी, शैलेश फडतडे अमित माने ,स्वप्निल कुंभार, ओंकार यादव,सचिन पवार आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
