
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कौठा सर्कल प्रतिनिधी-एस.डी.बोटेवाड
कंधार
कंधार शहरातील पंचायत समितीच्या पुढे असलेली गणपतराव मोरे विद्यालय कंधार या ज्ञानालयाने दरवर्षीच या मन्याड व गोदा खोर्यातील स्फूर्तिदायक उपक्रमातून भारतीय शूर सैनिकांना ३३३३ राख्या व ३३३३ सदिच्छा पत्र अन् सोबत १५ फुट लांबीची महाराखी पाठवितो असतो.उपक्रम सूरु झाल्यापासून म्हणजे १९१५ पासून तत्कालीन मुख्याध्यापक आदरणीय संभाजीराव कोनाळे सर दरवर्षीच सहभागी होवून उपक्रम यशस्वी करत यंदा कोरोना महासंकट संपल्यानंतर सध्याचे विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक आदरणीय गोविंदराव कौसंल्ये सर यांनी या उपक्रमास अनुमती देवून हा पुर्वीसारखा राबवून सहकार्य केले.त्यांना विद्यालयाचे आदर्श शिक्षक व कविराज, अभिनयकार प्रणित कुमार आनकाडे व सर्व विद्यालयातील आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर बंधु-भगीनींनी सहकार्य केले.यात विद्यालयातील शालेय भगीनींनी या रक्षाबंधन सणानिमित्तच्या स्फूर्तिदायक उपक्रमातून आपल्या भारतीय सैनिक बंधुराजांना सदिच्छा पत्र व राख्या पाठविण्यात आपली इच्छा प्रदर्शित करुन उत्स्फूर्त प्रतिसाद देत सदिच्छा पत्राचे लेखन करुन आपली देशभक्ती दाखवली.त्या बद्दल कंधार शहरातील सुंदर अक्षर कार्यशाळेनी संस्थापक विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर बंधु-भगीनींचे आभार मानत त्यांना मानाचा जयहिंद करते आहे.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार