
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
निवडणूक 2022 करिता आज नांदेड येथे जिल्हाधिऱ्यांमार्फत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली यामध्ये किनवट व माहूर तालुक्यातील एकूण 10 पैकी 6 गट हे अनुसूचित जाती व जमाती या संवर्गा करिता आरक्षित झाले आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद निवणुकित नवीन उमेदवारांना संधी मिळणार असून यामुळे सर्वच प्रमुख पक्षातील दुसऱ्या फळीतील युवक कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याने जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणातून स्पष्ट होत आहे. मात्र एकूण 6 गट आरक्षित झाल्याने किनवट माहूर विधानसभा क्षेत्रातील विद्यमान व जे बाशिंग बांधून बसले होते त्यांची निराशा झाली आहे. 5 गट हे अनुसूचित जाती व एक गट अनुसूचित जमाती महिला या संवर्गा करिता आरक्षित झाले आहेत. यामुळे लोकशाही व संविधानाची ताकत पुन्हा एकदा प्रकर्षाने यातून दिसणार आहे.