
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाडा तालुका-मनिषा भालेराव
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने चौकशीनंतर ताब्यात घेतले. या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेना वाडा तालुका शाखेच्या वतीने सोमवार दिनांक १ ऑगस्ट रोजी आक्रमक भूमिका घेत कारवाईच्या निषेधार्थ वाडा बस स्थानका समोर केंद्र सरकार व ईडीच्या विरोधात घोषणा दिल्या.तर पालघर लोकसभा सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे यांनी राज्यपाल भगत सिंग कोशारी यांचाही निषेध केला. याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.