
दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी-पंकज रामटेके
मंगळवारी, २ ऑगस्ट रोजी घुग्घुस येथील तलाठी कार्यालयात घर कोसळून जखमी झालेल्या महिलेला घुग्घुस भाजपाच्या पुढाकाराने धनादेश देण्यात आला.
जुलै महिन्यात घुग्घुस परिसरात सात दिवस संततधार पाऊस पडल्याने वार्ड क्र.१ येथील पौर्णिमा वाघमारे या वृद्ध महिलेच्या घराची भिंत १४ जुलै रोजी कोसळली यावेळी अंगावर घराचे कवेलू व लाकडी फाटे पडून ती जखमी झाली होती. याबाबत कळताच भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घुग्घुसचे तलाठी कार्तिक आत्राम, कोतवाल परशुराम पेंदोर यांना सोबत घेऊन नुकसानग्रस्त घराची पाहाणी केली होती व तलाठी कार्तिक आत्राम यांनी पंचनामा केला होता.
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन मदत मिळवून देण्यासाठी चर्चा केली होती. तसेच नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
त्याअनुषंगाने पौर्णिमा वाघमारे रा. घुग्घुस या दिनांक ८ जुलै ते १४ जुलैपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे भिंत पडून जखमी झाल्यामुळे शासनातर्फे दिले जाणारे सानुग्रह अनुदानाचा धनादेश औषध उपचारसाठी त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आला.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, तलाठी कार्तिक आत्राम, कोतवाल परशुराम पेंदोर, संकेत बोढे, रवी मुक्के, संजय गेडाम, संतोष मुक्के, संतोष ठमके, विठ्ठल हिकरे, विजय इंगोले, राजू उमरे, रामू बहुराशी, महेंद्र कोयाडा व वाघमारे कुटुंबिय उपस्थित होते.