
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनच्या पोलिसांची यशस्वी कामगिरी
चंद्रपूर
चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी एका चोरीच्या प्रकरणात तीन अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.या बाबत मिळालेल्या माहितीनुसार असे समजते कि चंद्रपूर येथील पठाणपूरा परिसरातील चहारे वाडीत वास्तव्य करणारे व्यवसायी नामे सुनिल रामदास चिप्पावार हे आपल्या परिवारासह देव दर्शना साठी शिर्डीला गेले होते या संधीचा फायदा घेत चोरटे त्यांचे घरात शिरले व त्यांच्या घरात असलेली गोदरेज आलमारी फोडून त्यातील ९४हजार रुपयांचे (सोन्याचे )दागिने लंपास केले .फिर्यादीच्या तक्रारी वरुन चंद्रपूर शहर पोलिसांनी क.४१५/२०२२कलम ४५४,४५७,व ३४०भादवि. अंतर्गत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला.या गुन्ह्याचा तपास ठाणेदार सुधाकर अंभोरे यांचे नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी लगेच सुरु केला . स्थानिक पोलिस स्टेशन मधील गुन्हेगारी रेकॉर्ड वरील तनविर बेग , आरीफ शेख व सुरज कुडकेलवार यांना पोलिसांनी संशया वरुन ताब्यात घेतले पोलिसांचा प्रसाद मिळताच त्यांनी या प्रकरणातील गुन्ह्याची कबुली दिली.सदरहू कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे व उपविभागीय पोलिस अधिकारी सुधिर नंदनवार यांचे मार्गदर्शनात शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर अंभोरे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल आणि गुन्हे शोध पथकातील पो.ह.शरीफ शेख , विलास निकोडे, महेन्द्र बेसरकर ,नापोशी जयंता चुनारकर ,चेतन गज्जलवार , सचिन बोरकर पोलिस शिपाई इमरान खान, रुपेश रणदिवे यांनी यशस्वीरित्या केली.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल करीत आहे.