
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – अनिल पाटणकर
वेल्हे जि.पुणे – भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने संपुर्ण भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे त्याच पार्श्वभूमीवर वेल्हे तालुक्यातील कातवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कातवडी येथे देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळा स्तरावर विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे त्यापैकी वेशभूषा ही स्पर्धा नुकतीच शाळा स्तरावर घेण्यात आली यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेत या स्पर्धेत सहभागी झाले होते. देशातील वेगवेगळ्या प्रांतातील वेशभूषा या विद्यार्थ्यांनी साकारुन देशातील वैविध्यता आणि अखंडतेची अनुभुती उपस्थितांना दिली.
या स्पर्धेसाठी केंद्राचे केंद्रप्रमुख मुल्ला सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका शिगवण मॅडम यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना वेशभूषा करण्यासाठी शाळेतील पदवीधर शिक्षिका चव्हाण मॅडम, उपशिक्षक लांडगे सर आणि जाधव सर यांचेसह प्रथम संस्था प्रतिनिधी भरत काटकर, सागर दिक्षित यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रथम संस्थेने देखील विद्यार्थ्यांना याकरिता प्रेरित केले होते.