
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती 20 ऑगस्ट रोजी ‘सद्भावना दिवस’ म्हणून देशभर साजरी केली जाते. खरं तर, सद्भावना दिवस हा सर्व भारतीयांमध्ये शांतता, राष्ट्रीय एकात्मता आणि सांप्रदायिक सौहार्दाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चिन्हांकित केला जातो.सद्भावना दिवस राजीव गांधींच्या विकसित राष्ट्राच्या संकल्पनेला प्रोत्साहन देतो, ज्याचा त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांद्वारे प्रचार करण्याचा प्रयत्न केला होता. विविध धर्म आणि श्रद्धा असलेल्या लोकांनी देशात शांततेने राहावे आणि हिंसाचार टाळावा हा या दिवसाचा संदेश आहे असं म्हणायला हरकत नाही. सद्भावना दिवसाचा उद्देश समाजात जातीय सलोखा, एकता, बंधुता आणि प्रेम निर्माण करणे हाच आहे.भूम तालुका कांँग्रेस कमेटी च्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीवजी गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी उस्मानाबाद जिल्हा कांँग्रेस चे उपाध्यक्ष विलास शाळू, तालुका कांँग्रेस कमेटी अध्यक्ष रुपेश शेंडगे, भूम शहराध्यक्ष महेमूद पटेल, परंडा विधानसभा युवक कांँग्रेस उपाध्यक्ष मोईज सय्यद ,मा.नगरसेवक सोपान वरवडे,शारूख पठाण बाळू कूचेकर उपस्थित होते.