
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी ग्रा.- बाजीराव गायकवाड
कंधार :- तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी हातचे पिके अतिवृष्टी झाल्यामुळे नष्ट झाल्यामुळे हवालदिल झाला असून त्यांना धिर देण्यासाठी शासनाने अतिवृष्टिची नुकसान भरपाई जाहीर केले आहे. परंतु कमी मनुष्यबळामुळे पंचनामे धिम्या गतीने होत आहेत. हे पंचनामे न करता सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात यावी. कारण सर्वाचेच नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ शेतकर्यांच्या बॅक खातात नुकसान भरपाई जमा करावी, तसेच सरसकट पिक विमा देण्यात यावे आणि ओला दुष्काळ जाहीर करून बँकाना कर्ज वसुली करु नका असे आदेश द्या. अगोदरच शासकीय मदत अपुरी असून पेरणीसाठी केलेला खर्च सुद्धा शासकीय मदतीने निघत नाही तेव्हा सावकारी कर्ज कशाने फेडायचे हा मोठा प्रश्न आहे. आज जरी पैसे पाठवले तरी शेतकरी बांधवांना पैसे भेटण्यासाठी सहा महिने बॅकेत चकरा माराव्या लागतात. त्यासाठी प्रशासनाने डायरेक्ट शेतकर्यांच्या बॅक खात्यात पैसे जमा करून शेतकर्यांना धिर देण्यासाठी, प्रशासनाने अतिवृष्टीची नुकसान भरपाई सरसकट देण्याची मागणी कंधार तालुक्यातील सर्व सर्कल मधिल शेतकरी बांधवांनी प्रशासनाकडे दैनिक चालू वार्ता पेपर च्या माध्यमातून केली आहे.