
दैनिक चालु वार्ता मुक्ताईनगर प्रतिनिधी -सुमित शर्मा
जळगाव –
जिल्हा परिषद जळगाव च्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी तथा ग स सोसायटी संचालक विजय शांतीलाल पवार यांची शिक्षण विभागातर्फे सातारा जिल्हा शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. दि 29 व 30 ऑगस्ट रोजी आयोजित दौऱ्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य श्री अनिल झोपे व जेष्ठ अधिव्याखाते यांचे पथकासह शिक्षण विभाग जिल्हा परिषद चे प्रतिनिधी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार शैक्षणिक पी. जी. आय.व गुणवत्ता वाढीसाठी सातारा जिल्हा परिषद मधील उपक्रमांचा अभ्यास करणार आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षणाधिकारी श्री विकास पाटील यांचे सह शिक्षण विस्तार अधिकारी संघटना आणि शिक्षकवृन्द यांनी अभिनंदन केले आहे.