
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी प्रतिनिधी – दत्तात्रय कराळे
परभणी : मागील महिना भरापासू न पावसाने दडी मारल्यामुळे परभणी तालुक्यातील खरीप हंगामाची पिके करपून गेली आहेत. अगोदर झालेली कमालीची पर्जन्यवृष्टी ज्यामुळे ओला दुष्काळ आणि आता मारलेली दडी पर्यायाने सुखा दुष्काळ या दुहेरी संकटात कैची प्रमाणे सापडलेला शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. महागडी बियाणे, खंत,औषधी विकत घेतांना अगोदरच तारेवरची कसरत करावी लागली होती. परिणामी आर्थिक विवंचनेत सापडलेल्या पिकांना ताबडतोब पावसाची किंवा धर्मातल्या पाण्याची नितांत आवश्यकता आहे.
परभणी तालुका शहरी व लगतच्या सर्व ग्रामीण भागातील कापूस, मूग, सोयाबीन, तूर, भक्ती, बाजरी, तांदूळ यांसारख्या खरीप पिकांना मागील महिनाभरापासून पाऊस नसल्याने कमालीचा ताण पडला आहे. परिणामी वाढ तर खुंटली आहेच त्याशिवाय पिकावर मोठ्या प्रमाणात करपून जात आहेत. आशेवर जगणाऱ्या हाता-तोंडाशी आलेला घास पण जातोय की काय, जणू अशाच विवंचनेत सापडलेला त्रस्त बळीराजा एका बाजूला वरुण राजाची चातकाप्रमाणे वाट पहात आहे तर दुसरीकडे कर्ज काढून उचललेला पैसा कसा फेडता येणार या भीतीच्या पूर्णपणे चक्रव्युहात सापडला आहे. पर्जन्यवृष्टी जर लवकर झाली नाही तर मात्र शासनाने तातडीने लक्ष घालून जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग करुन किमान पक्षी ते तरी पाणी द्यावे ज्यामुळे कांहीं अंशी तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल .
जायकवाडी धरणातले पाणी वेगाने सोडा : आ. राहूल पाटील
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
पाण्याअभावी करपत असलेली पिके वाचविणे गरजेचे असून मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना जीवदान देणे सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी शासनाने आणि पाटबंधारे विभागाने जायकवाडी धरणात ले पाणी तात्काळ सोडणे गरजेचे आहे अशी मागणी परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील यांनी केली आहे. आ. पाटील यांनी शासन व पाटबंधारे खात्याचे तातडीने लक्ष वेधले असून धरणातले पाणी विसर्ग करुन कालव्यात तात्काळ सोडले जावे अन्यथा परभणी तालुक्यातील त्रस्त शेतकऱ्यांचे जीवनमान कमालीचे डबघाईला आल्यावाचून राहणार नाही असेही आपल्या निवेदनात म्हटले आहे.
पावसाने मागील महिनाभरापासून पूरती दडी मारली आहे. अगोदर बाळसं आलेली परंतु नंतर पावसा अभावी करपली जाणारी हीच पिके उघड्या डोळ्यांनी बघावी लागत आहेत. परिणामी मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात दु:खाश्रू येत आहेत. शासन व पाटबंधारे विभागाने तातडीने लक्ष नाही घातल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे आ. पाटील यांनी आपल्या निवेदनाद्वारे म्हटले आहे.