
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
श्री.दुधेश्वर गणेश मंडळ,मेंढापूर या ठिकाणी कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी गणेश शिंदे यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून गणेशाची स्थापना केली. गणेश शिंदे पूर्वी करकंब पोलीस स्टेशनला असताना त्यांनी मेंढापूर बीट अंमलदार म्हणून काम केले होते. त्यावेळी काम करताना त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी काम करून हजारो लोकांची मने जिंकली होती व सर्वसामान्यांचे एक हक्काचे पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता.
आज याच त्यांनी मिळवलेल्या नावलौकिकामुळे मेंढापूर गावातील मित्रपरिवाराने त्यांना सहकुटुंब गणेश पूजेला बोलवले होते. कोरोनानंतर प्रथमच निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाच वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान आज ढोल पथकांने गणपतीला सलामी दिली.गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याचे गणेश मंडळांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
यावेळी शरद पाटील, शिवाजी थिटे, आबासाहेब गवळी, मोहन सुतार,राजू गवळी,अस्लम शेख तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.