
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
जावली तालुक्यांच्या शिस्तप्रिय आणि बालवयांतच वारकरी संप्रदायाची गोडी निर्माण करणारे तसेच गोसावी समाजांतील आधारस्तंभ आणि जावली तालुक्यांच्या विद्यमान सभापती ह.भ.प.सौ. जयश्रीताई गिरी यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहांत संपन्न राजकीय,सामाजिक तसेच शैक्षणिक धार्मिक तसेच गोसावी समाजांतून व जावली तालुक्यांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यांत आला. यावेळी समाजातीलच पत्रकार श्री. गोसावी यांनी विद्यमान सभापती सौ.जयश्री ताईंच्या त्यांच्या कामाबद्दल आढावा घेतला. आपल्या सामाजिक व राजकीय कार्यकर्तृत्वांने जिल्ह्यांतच नव्हे तर जावली तालुक्यांतील घराघरात पोहोचलेल्या गोरगरिबांची माई ठरलेल्या पंचायत समितीच्या विद्यमान शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष ह.भ. प जयश्रीताई गिरी त्यांचे पती माजी सभापती ह.भ. प सुहास दादा गिरी या दाम्पत्यांनी आगळावेगळा ठसा तालुक्यांच्या राजकारणात व समाजकारणात उमटवत एक आदर्श निर्माण केला. गोरगरिबांच्या असलेल्या व जावलीचे सभापती पद समर्थपणे सांभाळणाऱ्या जयश्रीताईंचा आज वाढदिवस त्यानिमिंत्ताने त्यांच्या कामाचा समाजातीलच पत्रकार श्री.संभाजी गोसावी थोडक्यांत आढावा घेतला… समाजामध्ये सामाजिक आणि राजकीय कार्यात आपले वेगळेपण जपून आपल्या कार्यकर्तृत्वांचा आलेख सतत उंचावत ठेवणारे क्वचित बघायला मिळतात. पण जावली तालुक्यांत सुहास दादा व जयश्रीताई हे दाम्पत्य त्यापैकी एक आपल्या घराण्यांचा वारकरी आणि संप्रदायिक वारसा जपत त्यांनी समाजसेवेचे घेतलेले वृत्त आग्रहांत पुढे सुरु ठेवले राजकीय ताकद यांच्या सुंदर मेळ तालुक्यांच्या प्रत्येक घराघरात त्यांचे असलेल्या जिव्हाळ्यांच्या हित संबंधामुळे आज जावली तालुक्यांतील जनता या दांपत्य त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे महिलांसाठी बचत गटाची स्थापना करुन विविध स्वयंरोजगार उपलब्ध करून महिलांना स्वावलंबी करण्यासांठी जयश्रीताई या तळमळीने काम करत आहेत. तसेच त्यांनी कोरोना काळातही ताईंनी गोर,गरिबांची माई होत खूप मोलाची कामगिरी केली. कोरोनाग्रस्तांना मानसिक आधार देवुन त्यांना जी मदत लागेल ती पुरविण्यांचे काम सौ.जयश्री ताईंनी चांगलेच केले होते. मोलमजुरी करणारी कुटुंबांना घरोघरी जाऊन धान्यांचे किट दिले कोरोना काळामध्ये मत पावलेल्या प्रत्येकांच्या घरी जावुन त्यांचे सांत्वन करुन ताईंनी त्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. गिरी दांपत्यांचे दहा टक्के राजकारण तर नव्वद टक्के समाजकारण अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे. ती पद्धत कायम ठेवीत जावली तालुक्यांतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यांत आपल्या आगळ्या वेगळ्या कामांचा ठसा उमटवणाऱ्या या आपल्या आदर्श कामांने गोर,गरिबांची माई ठरलेल्या ह. भ. प सौ. जयश्रीताई गिरी यांना दैनिक चालू वार्ताच्या सर्व परिवाराकडूंन सामाजिक व राजकीय वाटचालीस सौ. जयश्री गिरी ताईंना कोटी,कोटी शुभेच्छा.