
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-
घुगूस
भारतीय मजदूर संघ (वेकोलि समन्वय समिति)द्वारा वेकोलि प्रशासनाच्या कामगार विरोधी नीति च्या विरोधात सुरु असलेल्या ‘साखळी उपोषण’ च्या तिसऱ्या दिवशी, भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपुर के जिल्हाध्यक्ष मा. देवरावदादा भोंगळे यांनी भेट दिली.
या वेळी त्यांनी कामगार आंदोलनकरत्यास पुष्पमाला घालून सत्कार केला, प्रसार माध्यमासी बोलतांना त्यांनी भारतीय मजदूर संघ हे आमचे मातृसंघ असल्याचे बोलून दाखवले,भारतीय मजदूर संघ राजनीति पासून दूर जरी असेल तरी,कोल कामगारांच्या समस्या सोडवन्यसाठी आम्ही भारतीय मजदूर संघा सोबत असु असे उदगार काढले.
या वेळी त्यांच्या सोबत आलेले भारतीय जनता युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. विवेक बोढे सर् यांनी आंदोलनास शुभेच्या सह समर्थन दिले.
उपस्थित सर्व मा.पि. एन. वंजारी (अध्यक्ष भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी-माजरी,वणी श्रेत्र)मा. देवराव नन्नावरे (मंत्री भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी-माजरी,वणी श्रेत्र)उपोशनकर्ते मा.तुलशिराम माकोड़े (सचिव पैनगंगा परियोजना) श्री-लोकनाथ सिन्हा ,श्री-महादेव टेकाडे श्री-नवनाथ जेनेकर व उपस्थित क्षेत्रिय/उपक्षेत्रीय पदाधिकारी यांनी मा.देवराव दादा भोंगळे यांचे आभार मानले.
असे राजेंद्र पाचभाई भारतिय कोयला खदान मजदूर संघ वणी माजरी प्रचार /प्रसार मंत्री यांनी कळविले.