
दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी- माणिक सूर्यवंशी
खानापूर सर्कल. देगलूर तालुक्यातील खानापूर सर्कल मधिल खरीप हंगामातील पिके पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन,मूग ,उडीद, तुर, पीक धोक्यात असल्याचे चित्र दिसत आहे. मगृ नक्षत्रात पाऊस समाधानकारक पडल्यामुळे ब-याच शेतकऱ्यांची दुबार पेरणी झाली आहे . नदी नाल्याकाठची शेती अति पावसामुळे खरडून जाऊन खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता वीस दिवस झाले पाऊस पडत नाही या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पावसाने दडी दिल्यामुळे नाराजी दिसून येत आहे. कुठे पाऊस पडतो कुठे नाही अशामुळे हातात आलेले पीक अक्षरश: कडक उन्हामुळे सुकून गेलेली दिसत आहेत. आज जगाचा पोशिंदा शेतकरी राजा संकटात आहे. प्रशासनाने सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे असे शेतकरी वर्गातून मागणी आहे.