
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
कोरेगांव तालुक्यांतील देऊर येथील युवक गणपती सजावटीचे साहित्य घेवुन जात असताना टेम्पोच्या धडकेत देऊर येथील एकाचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाल्यांची घटना वाठार स्टेशन हद्दीमध्ये मंगळवारी सायंकाळी च्या सुमारांस घडली. यांमध्ये अभिषेक धनाजी राजे वय २२ रा. देऊर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक धनाजी राजे वय २२ , तर शुभम अडागळे रा. विखळे व समीर संभाजी राजे रा. देऊर हे तिघे मंगळवारी दिनांक ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजण्यांच्या सुमारास वाठार स्टेशन येथून गणपती सजावटीचे साहित्य घेवुन मोटरसायकल क्र. एम.एच १२ एन. एच यावरुन देऊर येथे जात असताना सातारा लोणंद रस्त्यावरील भारत पेट्रोलियम या पंपाजवळ सातारा बाजू कडूंन आलेल्या टेम्पो क्र एम. एच १२ एच.डी ३५७५ व मोटर सायकलची समोरासमोर धडक झाली. या धडकेत अभिषेक राजे यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले जखमींना पुढील उपचाराकरता तत्काळ सातारा येथील खाजगी रुग्णालयांत दाखल करण्यांत आले मृतांस शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुक येथे नेण्यांत आले असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार दिपाली गुरव करीत आहेत.