
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : आम्ही १६५ रोप वे केबल कार बांधतो आहोत. आमच्याकडे हवेत उडणारी एक बस आहे. त्या बसमध्ये १५० लोक बसतात आणि ती वरच्यावर जाते. ती डॉफल मेअरची आहे. त्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत. वरच्यावरून वाहतूक झाली तर त्याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे ट्रॉली बसचा पर्यायही वापरता येऊ शकतो. ज्यात दोन बस एकमेकींना जोडल्या जातात आणि ती बस इलेक्ट्रिक केबलवर चालते. इलेक्ट्रिक बसची किंमत सव्वा कोटी रूपये आहे. तेवढ्याच क्षमतेच्या ट्रॉली बसची किंमत ६० लाख रूपये आहे. त्यामुळे भांडवल गुंतवणूक कमी आहे. पुणे महापालिकेने अशी काही योजना तयार केली तर आम्ही त्यासाठी निधी देऊ शकतो असंही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.