दैनिक चालू वार्ता मुक्ताईनगर प्रतिनिधी-सुमित शर्मा
“मुख्याध्यापक सुनील बडगुजर यांनी उपक्रमासाठी केली पदरमोड”
“शाळेचा प्रत्येक घटकापासून मिळतेय शैक्षणिक अनुभूती…उपक्रमाचे परिसरातून कौतुक”
(मुक्ताईनगर)जळगाव जिल्हा परिषदेचे मा.मुख्यकार्यकारी अधिकारी श्री पंकज आशिया साहेब यांच्या संकल्पनेतून आणि मा. शिक्षणाधिकारी श्री विकास पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोदवड तालुका मुक्ताईनगर येथे बाला उपक्रम साकारण्यात आला (Building as Learning Aid) बाला हा एक शैक्षणिक उपक्रम आहे.शालेय परिसरात प्रत्येक वस्तू व शाळेचा प्रत्येक घटक हा शैक्षणिक साधन म्हणून उपयोगात आणणे हाच बाला उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सुरवातीला प्रत्येक तालुक्यातील दोन शाळा बाला मॉडेल स्कुल बनवण्याचे जिल्हा परिषदेने ठरविले त्यात मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा भागातील बोदवड येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत बाला उपक्रम साकारण्यात आला आहे.हा उपक्रम शाळेत राबवण्यासाठी मा. गटविकास अधिकारी श्रीमती दीपाली कोतवाल मा.गटशिक्षणाधिकारी श्री बी.डी धाडी शिक्षणविस्तार अधिकारी श्री राजू तडवी, केंद्र प्रमुख श्री अनिल पाठक यांनी दोन वेळा बोदवड गावात प्रेरणा सभा घेऊन गावकऱ्यांना उपक्रमाचे महत्व व उपयुक्तता स्पष्ट केली तसेच सर्व पालकांना,SMC व ग्रामपंचायत यांना प्रेरणा दिली बोदवड ग्रामपंचायत ,शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक, विद्यार्थी व गावकरी यांच्या आर्थिक सहाय्यातून व शिक्षकांच्या परिश्रमातून बाला उपक्रमला आकार मिळाला.नुकतेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिकेत पाटील यांनी शाळेला भेट देऊन आनंद व्यक्त केला. या उपक्रमासाठी थोड्याप्रमाणात लोकवर्गणीही झाली तरी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील बडगुजर यांनी स्व खर्चाने उर्वरित निकषांची पूर्तता केली.शाळेतील शिक्षक विजय बाऱ्हे, योगेश जवंजाळ, नितीन धोरण, रामेश्वर पाटील यांनीदेखील बाला उपक्रमासाठी खूप मदत लाभली. बाला उपक्रमांमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभव घेतात यात गुणवत्तेसोबत शाळेत रंगकाम, बांधकाम, समाज सहभाग या बाबींवर भर देण्यात आला आहे.परीसरातील शिक्षक व SMC सदस्य बोदवड शाळेत बाला उपक्रम बघण्यासाठी येत असून शाळेत बाला अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेले उल्लेखनीय उपक्रम म्हणजे लपंडाव भिंत,शब्द भिंत, सूर्यमाला, अंतर दर्शनवणारे दगड, दृश्य प्रतिमा, दृश्य भ्रम, बोलक्या भिंती, मी व माझे विश्व, कॉम्पुटर, अन्नसाखळी, जल चक्र, किचन गार्डन, हँडवश स्टेशन, पुस्तक कोपरे, सौर घड्याळ, रंगचक्र, भौमितीम आकाराचे कट्टे व ग्रील, मैदानावरील खेळ, उंचीनुसार फलक, कोनमापक, उंची मोजणे, व्हरांड्यातील बैठक व्यवस्था, अँफी थिएटर, लाईन बोर्ड, पिनअप बोर्ड, डॉट बोर्ड,शालेय नकाशा, दिशा दर्शक, सममिती, गिलाव्यातील अक्षरे, लेखनपूर्व साहित्य, बोर्ड गेम, बुद्धिबळ, टॅनग्राम टाईल्स, नैसर्गिक रंग फुले, कचरा व्यवस्थापन, शुद्ध जल,पक्षी खाद्य व पाणवठे, शौचालय, रेन वाटर हार्वेस्टिंग, व्ही स्कूल अँप,नैसर्गिक अध्ययन साहित्य, पोस्टबॉक्स असे नाविन्यपूर्ण अनेक उपक्रम शाळेने विद्यार्थ्यांसाठी राबविले आहेत यासाठी सरपंच शालुताई तायडे, उपसरपंच इंदुबाई कोंगळे व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अशोक कांडेलकर उपाध्यक्ष कविता मोरे, सदस्य पंजाबराव पाटील, विष्णू पाटील, लहू घूळे, ज्ञानदेव मांडोकार, कमलाकर तायडे,गणेश सोनवणे, योगिता घाईट, नम्रता पतोंड, वनिता कोंगळे यांचे सहकार्य लाभले.
