दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
सातारा. स्थानिक गुन्हे शाखेची गेले दीड वर्षापासून धुरा सांभाळणारे पोलीस निरीक्षक किशोर जी धुमाळ साहेब यांची पुणे ग्रामीण पोलीस दलांमध्ये बदली झाली आहे. त्यामुळे एलसीबीचा नवीन कारभारी कोण होणार? याकडे जिल्हा पोलीस दलाचे चांगलेच लक्ष लागले आहे. पोलीस निरीक्षक किशोर जी धुमाळ साहेबांनी सातारा जिल्हा पोलीस दलांमध्ये विविध ठिकाणी काम केले शाहुपुरी पोलीस ठाण्यांचा कारभार पाहत असताना अनेक संवेदनशील गुन्ह्यांचा छडा त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यांतील सर्व पोलीस ठाण्यांच्या कर्मचार्यांसमवेत लावला. राजेच्या गटांत राडा झाला होता. त्यावेळीही कायदा व सुव्यवस्था बिघडू न देण्यांचे जबाबदारी धुमाळ यांनी पेलली होती. शाहुपुरी पोलीस स्टेशनच्या कालावधीनंतर त्यांची कराड ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यांत बदली झाली होती. त्यांच्या कार्यकाळामध्ये श्री. धुमाळ यांनी जबरी चोऱ्या मुकांतर्गत तसेच विविध मोठमोठे गुन्हे आपल्या पोलीस सहकार्यांसमवेत उघडकीस आणले. पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे सातारा जिल्ह्यांतील सुपुत्र असल्यांने त्यांना जिल्ह्यांची चांगलीच माहिती होती सध्या ते सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे कारभारी होते. श्री.धुमाळ यांची कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून सातारा जिल्हा पोलीस दलातच नव्हे तर पोलीस प्रशासन विभागांमध्ये चांगली ओळख होती. श्री धुमाळ यांचे जिल्ह्यांतीलच पत्रकार श्री.गोसावी यांनी दूरध्वनीच्या माध्यमांतून संपर्क साधत पोलीस निरीक्षक श्री.धुमाळ यांचे अभिनंदन व त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुक केले.
