
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर– प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे निवेदन देण्यात आले आहे की, गेल्या वर्षी प्रमाणे या ही वर्षी लंपी या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे, पशुवैद्यकीय दवाखाना वर्ग 1 किनगाव येथे अजुनही *प्रतीबंधक Goat pox लस* व औषध उपलब्ध झाली नाहीत त्यातच दवाखान्यात कित्येक वर्षांपासून एक शिपाई व ड्रेसर पद रिक्त असल्यामुळे मनुष्यबळ कमतरता भासणार असल्याने दिसुन आले आहे किनगाव हे गाव चार जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्यांमुळे 60/70 गावाचा या दवाखान्याशी संबंध येतो पशुधन संख्या जास्त असल्याने या साथीच्या रोगाने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी तात्काळ रिक्त असलेले मनुष्यबळ व लंपी स्कीन प्रतीबंधक लस उपलब्ध करून द्यावे अशी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी लातुर, मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी लातुर यांना तहसिलदार, पशुसंवर्धन सहआयुक्त अहमदपूर यांच्या मार्फत मागणी करण्यात आली आहे प्रमुख उपस्थिती प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले, शाखाअध्यक्ष योगेश आमले, उपाध्यक्ष शेख मोहसीन, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी, सचिव दशरथ हैगले,सहसचिव महेश चाकाटे, युवा अध्यक्ष गोविंद आंधळे, सहसंघटक वैजनाथ सुनेवाड, संघटक श्रीराम दहिफळे ,तालुका पदाधिकारी म्हणुन तालुका अध्यक्ष संभाजी दादा केंद्रे युवा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड , उपाध्यक्ष सतिश पुरी,सचिव नवनाथ तरोडे अदिजण प्रहार पदाधिकारी प्रहार सेवक उपस्थित निवेदन देण्यात आले