
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडून देणारी धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात समोर आली आहे. चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याने सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी औरंगाबाद शहर हद्दीतील सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष वाघ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, तो औरंगाबाद ग्रामीण पोलिसात सोयगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
संतोष वाघ याने सराफा व्यापाऱ्याला केंब्रिज चौकात अडवून पोलीस असल्याचा सांगत चौकशी करण्याच्या बहाण्याने अडवलं. त्यानंतर तब्बल 26 तोळे सोनं आणि साडेआठ लाख रुपये कॅश सराफा व्यापाऱ्याकडून लुटले. त्यानंतर सराफा व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दिली. अखेर पोलिसांनी संतोष वाघच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला ताब्यात घेतले आहे.