
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी : जब्बार मुलाणी
===≈===============
पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीमधील मा. स्थायी समिती सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते..
याप्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रविंद्र बिनवडे यांनी पंचकुला (हरियाणा) महानगरपालिकेच्या शिष्टमंडळातील सदस्य यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
पंचकुला (हरियाणा) महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाकडून मा. सुरेश वर्मा, मा. श्रीमती सोमिया सुद, मा. जय कौशिक, मा. सुमित सिन्हा, मा. गौतम प्रल्हाद, मा. अक्षयदीप चौधरी इत्यादी सदस्य तसेच मा. दिपक सुरी, मा. सुमित मलिक, मा. मनोज, मा. अमित सिन्हा, इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये पुणे महानगरपालिकेतील विविध खातेप्रमुखांनी आपल्या विभागाच्या कामकाजाची संपूर्ण माहिती प्रेझेंटेशनद्वारे दिली. यावेळेस पाणीपुरवठा, आरोग्य, घनकचरा, जायका प्रकल्प, बांधकाम अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी मा. सहमहापालिका आयुक्त तथा नगरसचिव शिवाजी दौंडकर, मा. उप आयुक्त राजेंद्र मुठे, मा. प्रमुख आशिष भारती, मा. विधी अधिकारी निशा चव्हाण, मा. अधिक्षक अभियंता अनिरुध्द पावसकर, आरोग्य मा. अधिक्षक अभियंता श्रीनिवास कंदुल, मा. अधिक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, मा. उप आयुक्त आश राऊत, डॉ. केतकी घाडगे इत्यादी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.