
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
कोरेगांव तालुक्यांतील पिंपोडे बुद्रुक गावच्या हद्दीमध्ये रविवारी दुपारच्या झालेल्या दोन दुचाकीच्या समोरासमोर धडकेमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये तेजा भोसले ( वय २०) रा. तरडगांव ता. फलटण हा जागीच ठार झाला. तर (दत्ता नेवसे वय २५रा. करंजखोप ता.कोरेगांव ) हा गंभीर जखमी झाला याबाबत वाठार पोलीस स्टेशनकडूंन मिळालेल्या माहितीवरुन रविवारी दुपारच्या सुमारांस हिरो स्प्लेंडर दुचाकी( क्रमांक एम .एच ११ सी एम २७४७) वरुन दत्ता नेवसे हा पिंपोडे बुद्रुक बाजूकडुंन सोनके गावच्या दिशेने निघाला होता त्याचवेळी समोरुन विना नंबरप्लेट नसलेली दुचाकीवरुन आलेल्या तेजा भोसले यांच्या गाडीची समोरासमोर जोरदार धडक बसली ही धडक इतकी जोरात होती की यांमध्ये तेजा भोसले हा हवेत उडून रस्त्यावर आढळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या दता नेवसे याच्यावर पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयांत उपचार करुन अधिक उपचारासाठी त्याला सातारा येथे हलविण्यांत आले. या अपघातामुळे परिसरांत एकच खळबळ उडाली. या घटनेची नोंद वाठार स्टेशनला झाली.