
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूमः शिंदे गटाचे नेते रामदास कदम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बेताल वक्तव्य करत असून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे .त्यामुळे महाराष्ट्रात असलेली शांतता भंग होऊन महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुख्य चौक गोलाई या ठिकाणी शिवसेना,युवासेना यांच्या वतीने रामदास कदम यांच्या प्रतिमेस जोडे मारून अंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी निम का पत्ता कडवा है ! रामदास कदम भडवा है!उद्धव साहेब अंगार है! बाकी सभ भंगार है. यास वेगवेगळ्या घोषणा देत शिवसैनिकांनी कदम याचा निषेध नोंदवला.
यावेळी युवासेना जिल्हा प्रमूख डॉ. चेतन बोराडे , विधानसभा प्रमुख भूम परांडा वाशी प्रल्हाद आडागळे , शिवसेना विधानसभा समन्वयक दिलिप शाळू, तालुका प्रमूख अँड श्रीनिवास जाधवर ,उपशहरप्रमुख सरप्राज कुरेशी,युवा सेना तालुका प्रमुख सुधिर ढगे,उपतालुका प्रमुख रामभाऊ नाईकवाडी युवा शहर प्रमूख आविनास जाधव,अपंग सेना उपजिल्हा प्रमुख सोमनाथ लोखंडे,अपंग सेना तालुका प्रमुख श्रीकांत केदारी,सदानंद जोगदंड,बबन माने,भरत सुरवसे, नुतन शाखा युवा आधिकारी प्रज्वल गायकवाड,उपाध्यक्ष रामा चोरमले,सचिव मंगेश जाधव,सहिल शेख,प्रथमेश नाईक,वैभव भोरे,बंटी पाटील यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते.