
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा -गुणाजी मोरे
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे या मागणीच्या पूर्ततेसाठी पुणे बार असोसिएशनच्या बैठकीत एक कायमस्वरूपी कृती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात होण्यासाठी पुढील दिशा आता पुणे खंडपीठ कृती समिती ठरवणार आहे. आणि त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
पुणे येथे खंडपीठ व्हावे ही मागणी 1977 ची असून आत्तापर्यंत या मागणी वरती कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.
1977 साली मराठवाड्यासाठी औरंगाबाद खंडपीठाची मागणी आणि त्याच वेळी पुणे खंडपीठाची मागणी करण्यात आली होती परंतु औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू झाले पण पुणे येथील खंडपीठाची मागणी अद्याप कागदावरच आहे.
यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य हर्षद निंबाळकर अहमद खान पठाण राजेंद्र उमाप यांच्यासह बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचेचेअरमन सुधाकर आव्हाड आणि डी. डी. शिंदे,ॲड. गुणाजी मोरे यांनी सुद्धा या विषयावर सीनियर्स मंडळीशी चर्चा केली यांच्यासह बार असोसिएशनचे आजी व माजी अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.