
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा- गुणाजी मोरे
विद्येची देवता म्हणून हिंदु संस्कृतीत माता सरस्वतीला असलेले अनन्यसाधारण महत्त्व माहीत असून देखील शाळांमध्ये सरस्वती पुजनास विरोध करणाऱ्या संस्कृती आणि परंपराद्रोही छगन भुजबळांविरोधात आज पुणे शहर भाजपाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे.
पुरोगामित्वाचा बुरखा पांघरूण हिंदू संस्कृतीच्या विरोधात असणाऱ्या लोकांची मखलाशी करण्यासाठी सातत्याने हिंदुंच्या अस्मितेवर बोट ठेवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच करत आले आहे. मात्र ज्याचा विद्येशी संबंध नाही त्या माणसाने सरस्वती पूजनाला विरोध करावा हा अतिरेक भाजपा सहन करणार नाही. छगन भुजबळ यांचा जाहीर निषेध !
यावेळी भा.ज.पा.शहर अध्यक्ष मा. जगदीश मुळीक, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दत्ताभाऊ खाडे, प्रमोद कोंढरे, यांच्यासह माजी नगरसेवक, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.