
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
माळी महासंघाच्या वतीने इंदापुर तालुक्यातील झगडेवाडी येथील सामाजिक युवा कार्यकर्ते व सुर्या फाऊंडेशन इंदापूर चे संस्थापक अध्यक्ष करण मच्छिंद्र झगडे यांची नुकतीच माळी महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र युवक कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली असल्याची माहिती माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरूण तिखे यांनी दिली.
सामाजिक कार्याची आवड असणारे होतकरू करण झगडे यांनी सुर्या फाऊंडेशन च्या माध्यमातून आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.समाजातील सर्व सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी करण झगडे यांची धडपडत असुन स्वतःच्या हिंमतीने व कर्तृत्वावर त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात करण झगडे यांचा खुप मोठा मोलाचा वाटा आहे. युवक संघटन असणारे करण झगडे यांची माळी महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र युवक कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल युवक वर्गातुन अभिनंदन होत आहे.