
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : मानवत तालुक्यातील सावरगाव येथे “संत सावता महाराज” सभागृहाचे भूमिपूजन परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या हस्ते झाले. देवी-देवतांची सर्व शक्ती स्थाने, धार्मिक स्थळं आणि त्या अनुषंगाने पुरक घनिष्ठता असलेली वास्तू स्थाने यांचेशी खा. संजय जाधव यांचे पूर्वापार चालत आलेले अतूट नाते आहे. समाज सेवेबरोबरच भक्ती मार्गात अधिकाधिक लीन होणारे खा.संजय जाधव यांचे अनेक धार्मिक संस्थांशी स्नेहाचे संबंध आहेत. पाथरीचे श्री साईबाबांचे श्रध्दास्थान असो की, तिरुपतीचे तिरुमल्ला-बालाजींचे जागतिक कीर्तीचे श्रीमंत देवस्थान, या व अशा धार्मिक स स्थळांशी त्यांचे भक्तीमय संबंध गेली अनेक वर्षे आहेत.
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुका आणि तेथील सर्वांगीण विकास याचेशी खा. जाधव यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. किंबहुना त्याच अनुषंगाने संत सावता महाराज सभागृहाचे उद्घाटनाचा उपक्रम सुध्दा त्यांच्याच प्रयत्नांतून साकारला गेल्यास आश्चर्य वाटू नये.
सुमारे सात लाख रुपयांची लागत या विकास कामांसाठी लागणार असून ते काम लवकरात लवकर आणि चांगल्या पध्दतीने पूर्णत्वास नेले जावे यासाठीचे प्रयत्न केले जाणार असल्याचे समजते.
याप्रसंगी मानवत तालुक्यासह जिल्हाभरातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.