
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी .
नांदेड जिल्ह्यांमध्ये डॉ. विपीन इटनकर यांच्या नागपूर जिल्हाधिकारी बदलीनंतर नांदेड जिल्हाधिकारी हे पद जवळपास दोन महिन्यांपासून रिक्त होते. अखेर गुरुवारी शिंदे-फडवणीस यांनी काही राज्यांतील बडया अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये वेळोवेळी उत्कृंष्ट जिल्हाधिकारी पुरस्कारांने सन्मानित करणारे जळगांव जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची नांदेड जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यांत आली. अभिजीत राऊत हे २०१३ मधील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी नांदेड जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांच्याकडूंन स्वीकारला. सन २०१४ ते १५ मध्ये त्यांनी सांगली ते सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीस प्रारंभ केला. सन २०१५ ते २०१७ या कालावधीत त्यांनी तळोदा येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्पांचे प्रकल्प संचालक म्हणून वैशिष्ट्यपणे कार्य केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवला होता. जून २०२० पासून ते जळगांव जिल्हाधिकारी पदाचा पदभार त्यांनी स्वीकारला होता. स्वच्छता क्षेत्रांत सांगली जिल्हा राष्ट्रीय पातळीवर पहिला आल्याबद्दल सन २०१७ मध्ये भागात सरकारचा स्वच्छता दर्पण पुरस्कारांने ते सन्मानिंत झाले होते. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना अभिजीत राऊत हे वेळोवेळी पुरस्कारांने सन्मानित उत्कृंष्ट जिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनांचा त्यांना पुरस्कार मिळाला होता. अभिजीत राऊत यांची सांगली प्रशासन विभागांमध्ये अजूनही चांगलीच ओळख आहे. तेथील कालावधीनंतर त्यांची जळगांव जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली होती. जळगांव जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक उपक्रम राबवले तसेच कोरोनांचा मुकाबला चांगलाच राऊत त्यांनी केला होता. गुरुवारी सायंकाळी उशिरा राज्य सरकारकडूंन झालेल्या बदलांमध्ये अभिजीत राऊत हे नांदेड जिल्हाधिकारी पदी त्यांची नियुक्ती करण्यांत आली. राऊत बदलीचा आदेश मिळताच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हजर राहून शुक्रवारी त्यांनी पदभार स्वीकारला.