
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: देगलूर येथील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माछरे साहेब सत्कार करण्यात आला यांनी तेलंगाना राज्यातून चोरीस गेलेल्या गाईचा एक टेम्पो अतिशय उत्कृष्टरित्या धाडसीने सिनेमा स्टाईल पाठलाग करून मरखेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मद्दे साहेब व पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे व त्या टीम मधील सर्व कर्मचाऱ्यांच्या शीताफिने पकडल्यामुळे तेलंगानातील शिवा संघटना व देगलूर तालुक्यातील शिवा संघटनेतर्फे देगलूर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माछरे साहेबांचा सत्कार करताना तेलंगानातील आमचे विरशैव लिंगायत समाजाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते पंडितराव पाटील एकलारकर,शिवा संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोकराव मजगे,शिवा संघटनेचे शहराध्यक्ष व काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष रुपेश पाटील भोकसखेडकर,सुधाकर पाटील कोटचीरकर,हनमंतराव शेटकार हिप्परगेकर, शंकर पाटील अंतापुरकर,मल्लिकार्जुन मजरे पाटील,राहुल पाटील खरगकर,हनमंतराव बिरादार खरगकर,यादव गोरलावार या सर्वांनी साहेबांचा येथे सत्कार करून शुभेच्छा दिल्या…