
दैनिक चालु वार्ता बहादरपुरा-नरसिंग पेठकर
⚡ विविध द्रावण एकत्र करून पेस्टची निर्मिती
कंधार येथिल वसंतराव मरावाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्नित ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ नेहरूनगर संचालित, वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय,नेहरूनगर येथील सत्र सातच्या विद्यार्थिनींनी बहाद्दरपुरा येथे बोर्डेक्स पेस्टचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले.
यादरम्यान विद्यार्थिनींनी बोर्डेक्स पेस्ट बनवण्यासाठी पुर्वीच्या दिवशीच पेस्ट साठीचे द्रावण तयार केले होते. यामधे १०० ग्रॅम मोरचुद,१०० ग्रॅम चुना प्रत्येकी ५०० लिटर पाण्यामध्ये टाकून द्रावण तयार केले. २४ तास विरघळण्यासाठी ठेवले. दुसऱ्या दिवशी ते द्रावण एकत्र करून पेस्ट तयार केले. लिंबूवर्गीय फळझाडांना ब्रशच्या साह्याने एक समान लावण्यात आले. यादरम्यान कृषी कन्या कुमारी श्रद्धा यादव आणि कुमारी शालिनी राणडे यांनी शेतकऱ्यांना बोर्डेक्स पेस्टचे महत्व समजावून सांगताना त्याचे विविध फायदे सांगितले.
यावेळी विद्यार्थिनींना कृषी महाविद्यालय नेहरूनगर येथील अध्यक्ष संजय पवार, प्राचार्य डॉ. आर. बी.पवार, कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. एस.पवार, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्राची काळे व वनस्पती रोगनिदान शास्त्र विभागाच्या प्रा.दिपाली भारती यांचे मार्गदर्शन लाभले.