
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि- मानिक सुर्यवंशी
देगलूर तालुक्यातील मौजे नरंगल येथे सर्वात मोठी महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकांमध्ये अत्यंत चुरशीच्या अशा निवडणुकीत आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांना शह देऊन ताराकांत पाटील नरंगलकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सन्मान पॅनलचा दणदणीत विजय झालेला असून या विजयासंदर्भात खानापूर व शहापूर काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने नरंगल येथे भव्य नागरी सत्कार काल पार पाडला. यावेळी उपस्थित अनंतराव पाटील,सुनील पाटील तडकेलकर, खानापूरकर,प्रशांत पाटील आचेगावकर , गजानन पाटील मुजळगेकर मराठवाडा सेवा संघ तालुका अध्यक्ष, मारोतीराव हानेगाव चैनपुरकर ,राजु देशय,गोवरधन पा,हानुमाहिपरगेकर, मला रेड्डी शहापूरकर, प्रकाश पाटील शेळगावकर, प्रदीप वाघमारे सरपंच चेनपूरकर, शिवकुमार ताडकुले खानापूरकर, , शिवकांत पाटील तडकेलकर, बालाजी माळगे चैनपुरकर, उमाकांत मुंडकर चैनपूरकर, संग्राम भांगे तडकेलकर, मारोतराव परबते खानापूरकर, शिवराम येवले तडकेलकर, सचिन पाटील खानापूरकर,दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि मानिक सुर्यवंशी, तसेच भारत जोडो यात्रे संदर्भात देशाचे नेते माननीय राहुलजी गांधी यांनी काढलेल्या पदयात्रे संदर्भात पदयात्रेचे प्रतिनिधि श्री बसवराज पाटील वनाळीकर यांनी भारत जोडो यात्रे संदर्भात विस्तृत असे मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त जनतेने यात्रेमध्ये सहभाग घ्यावे असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. काल झालेल्या कार्यक्रमात खानापूर, शहापूर, वन्नाळी, चैनपुर, मंडगी, वझरगा,हनुमान हिप्परगा, सांगवी, आलुर, तमलुर, शेवाळ,सांगवी,मुजळगा,हावरगा.देगलुर,कुरूटगी, इत्यादी गावचे सर्व काँग्रेस पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते या झालेल्या कार्यक्रमामुळे नरंगल सेवा सहकारी सोसायटीत निवडून आलेल्या उमेदवारांना तर पाठबळ मिळालेच परंतु सबंध तालुक्यांमध्ये एक काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य कालच्या कार्यक्रमातून झाले.