
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हा कार्याध्यक्ष राजेश शिवाजीराव भिसे सरांची निवड.
त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये अलौकिक कार्यामुळे त्यांना शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन राजे शिवाजी भिसे यांना लातूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करून त्यांना 01/10/2022 रोजी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले त्यांच्या या नियुक्तीमुळे त्यांच्या मित्र परिवार व लातूर शहरातील व ग्रामीण भागातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे राजेश शिवाजी भिसे नेहमी आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम घेऊन आपल्या केंद्रामध्ये व लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या शैक्षणिक कार्याचा ठसा उमटला आहे ते नेहमी आपल्या शाळेमध्ये मुलांना स्वयंअध्यमावर भर देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्याकडून शैक्षणिक कार्य कसे करून घेता येईल याकडे त्यांचं विद्यार्थ्याकडे सतत मार्गदर्शन असत ते नेहमी म्हणतात मुलं शिकत शिकत शिकतात अशा या आदर्श शिक्षकाचे लातूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे व आपल्या शाळेमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना चांगला आदर्श नागरिक घडवला पाहिजे