
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे
निगडी – देशभरात अशोक विजया दशमी व ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.त्या निमित्ताने निगडी येथे “कार्यकर्ता आंबेडकर विचारांचा” च्या वतीने भव्य धम्म संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
निगडी परिसरातील सर्व बुद्ध विहारांना भेटी देत मानव कल्याणाच्या मार्ग दाखवणार्या तथागत बुद्धांच्या विचारांचा प्रसार करत जगातील सर्वात मोठी रक्त विरहित क्रांती करणारे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करण्यात आला.
सामुदायिक बुद्ध वंदना पठण करून उपस्थित मान्यवरांनी बुद्ध धम्माचे महत्त्व आपल्या भाषणातून व्यक्त केले.
सदर धम्म संदेश यात्रे भागातील नागरिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.