
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
सातारा जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी गुरुवारी दुपारी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी सातारा जिल्हा हा पंचायत राजची प्रयोगशाळा आहे. जिल्ह्यांतील लोकांचे प्रश्नं गावातच सोडविण्यांचा प्रयत्न करु असा आत्मविश्वांस बोलून दाखवला. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची पदोन्नती झाली आहे चंद्रपूरचे ते जिल्हाधिकारी झाले आहेत. त्यामुळे गौडा यांच्या जागी ज्ञानेश्वर खिलारी यांची नियुक्ती करण्यात आली गुरुवारी दुपारच्या सुमारास नूतन सीईओ ज्ञानेश्वर खिलारी जिल्हा परिषदेत हजर राहुन आपला पदभार स्वीकारला. यावेळी मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारा जवळ सर्व अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर खिलारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनांत येवुन विनय गौडा यांच्याकडूंन पदभार घेतला.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक सुषमा देसाई सामान्य प्रशासनांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव लेखा अधिकारी विकास सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.